Pravin Darekar | भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल ! ‘शिवसेनेनं 25 वर्षे मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्या’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईसह ठाणे, पुणे आणि इतर महापालिकांच्या आगामी निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) एकत्र लढणार असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. यातच आता भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेने 25 वर्षे मुंबई गिळली आहे. मुंबईकरांना काय दिले याचे उत्तर द्यावे, अशी विचारणा प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मला वाटते 25 वर्षे मुंबई त्यांनी गिळली. मुंबई हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे समजण्यात आले. मुंबईकरांच्या हाती काय दिलं. याचे पहिलं उत्तर द्या. शिंदे हे शिवसैनिक होते आणि आहेत. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांचे कडवट विचारांचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांना मुंबईच्या ज्या संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या (Fadnavis-Shinde Government) आहेत, असे दरेकर म्हणाले.
ते वैफल्याने ग्रासले आहेत
महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती, परंपरा अशा प्रकारचे टोमणे. मत्सराने बोलणे हे अलीकडच्या काळात वाढत आहे. हे राजकारणाला शोभणारे नाही. यामुळे ते वैफल्याने एवढे ग्रासले आहेत. त्यामुळे ते दररोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत, अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी जोरदार हल्लाबोल केला.
आधीचे सरकार अफजल खानाच्या विचारांचे
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, आताचे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे सरकार आहे.
तर यापूर्वीचे सरकार हे अफजल खानाच्या विचाराचे होते. तशा प्रकारची सरकारची मनोवृत्ती होती, असा घणाघात त्यांनी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pravin Darekar | bjp pravin darekar slams shiv sena chief uddhav thackeray over bmc election 2022
हे देखील वाचा :
Comments are closed.