नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Prakash Raj | दाक्षिणात्य जेष्ठ आणि स्टार अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपघाताबाबत स्वतः माहिती दिली आहे. त्यांना पडल्यामुळे फ्रॅक्चर (Fracture) झाला असून लवकरच त्यांच्यावर हैदराबाद (Hyderabad) मध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकाश राज यांच्या अपघाताबाबत माहिती सर्वत्र पसरली. आता त्यांना शत्रक्रियेसाठी (Surgery) हैदराबादला रवाना व्हावे लागते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रकाश राज यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की, ‘एक छोटासा अपघात (पडणे), एक छोटासा फ्रॅक्चर, शस्त्रक्रियेसाठी माझा मित्र डॉ. गुरूवरेड्डी यांच्याकडे हैदराबादेत जात आहे. ठीक होईल, चिंतेचे काहीही कारण नाही. प्रार्थनेत राहू द्या, असं प्रकाश राज (Prakash Raj) यांनी सांगितलं आहे. दरम्यान राज यांच्या ट्विटनंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्यात. तुम्ही लवकर ठणठणीत व्हाल, असे एका चाहत्याने लिहिले. डॉ. गुरूवरेड्डी, प्लीज यांचा योग्य उपचार करा, असं देखील चाहत्यांकडून सांगण्यात आलं आहे.
प्रकाश राज यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतही विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंघम'(Singham) या चित्रपटात त्यांनी जयकांत शिकरेची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका मोठ्या प्रमाणात गाजली होती. दरम्यान, प्रकाश राज (Prakash Raj) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. सिंघम, घिल्ली, वॉन्टेड, अन्नियन आणि पोकिरी सारख्या चित्रपटांमधील अभिनयामुळे ते प्रसिद्ध आहेत. सध्या, हे अभिनेते चित्रपट कलाकार संघाच्या मुव्ही आर्टिस्ट्स एसोसिएशन (MAA) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे. हैदराबादमध्ये MAA च्या निवडणुका होणार आहेत.
Web Title :- prakash raj meets accident says he will undergo surgery hyderabad
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Crime News | तेलंगणात भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला जिवंत जाळले