सध्या देशात अघोषित आणीबाणी : अॅड. प्रकाश आंबेडकर
February 11, 2019
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात सद्या अघोषित आणीबाणी आहे का ? असा प्रश्न चर्चिला जातो. त्यातच सहित्यिक, कलावंत, राजकारणी, या व्यवस्थेला जाब विचारत आहेत. जेष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना काल सरकारच्या धोरणाविरोधात बोलताना रोखण्यात आले होते. या प्रकाराचा अॅड. प्रकाश आंबेडकरांनी निषेध केला. ते म्हणाले, आज देशभरात सरकार विरोधातला आवाज दाबला जात आहे.
पश्चिम बंगालमध्येसुद्धा भाजपाने जे केले तोही याचाच भाग होता. कार्यक्रमासाठी कोर्टातून सहजपणे परवानगी मिळत असताना ती न घेता भाजपने आपली हुकूमशाही वृत्ती आणि मनमानीपणा दाखवत पश्चिम बंगालमध्ये गोंधळ निर्माण केला. अमोल पालेकर हे कला आणि सांस्कृतिक धोरणाच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना रोखले गेले. ही कृतीसुद्धा हुकूमशाही वृत्ती आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अमित शाह यांनी त्यांच्या पक्षाकडून राज्यातल्या सगळ्या जागांवर निवडणूका लढवून जिंकण्याचे वक्तव्य केले होते. यावर आंबेडकर म्हणाले, अमित शहा यांनी राज्यातल्या लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात. त्यातील किमान ४० जागांवर व्हीव्हीपॅट मशीन लावून आणि त्याची प्रिंट मिळेल, अशी व्यवस्था करावी, म्हणजे ते किती यशस्वी होतील ते पाहू असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
Comments are closed.