नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटातून देशाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन वाढविण्याची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम गरीब कुटुंबांवर झाला आहे. आता या लोकांना मदत करण्यासाठी सरकार दरमहा 500 रुपये गरीब महिलांच्या जनधन खात्यात टाकणार आहे. ही मदत तीन महिन्यांसाठी दिली जाईल. याच पार्श्वभूमीवर सरकारने महिला जन धन खात्याअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 500 रुपयांचा दुसरा हप्ता पाठविणे सुरू केले आहे.
परंतु, लोकांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाल्यानंतर बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळेच बँकेने टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याची योजना आखली आहे. एसबीआयने एक टाइम टेबल तयार केले आहे, त्या आधारे हा लाभधारक त्याच्या खात्यातून पैसे काढू शकेल.
या पद्धतींद्वारे काढू शकता पैसे –
सरकारने सांगितले की, ते त्यांच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन त्यांच्या रुपे कार्ड, बँक मित्रमार्फत पैसे काढू शकतात. त्यांना बँकेच्या शाखेत गर्दी करणे टाळावे लागेल. तसेच कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अलीकडेच सरकारने यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली.
9 मेपर्यंत सर्वांच्या खात्यात पहिला हप्ता
शासकीय आदेशानुसार, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन खात्यात दरमहा 500 रुपये रक्कम तीन महिन्यांसाठी देण्यात येईल. त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार, खातेधारकांच्या खात्यात पैसे वेगवेगळ्या दिवसात जमा केले जातील, जेणेकरून कोणताही त्रास होणार नाही.
हे आहेत नियम
– जनधन खाती ज्यांचा शेवटचा अंक 0 किंवा 1 आहे, ते 4 मे रोजी त्यांच्या खात्यात पैसे जोडले जातील.
– जनधन खात्यांचा शेवटचा अंक 2 किंवा 3 असल्यास 5 मे रोजी त्याच्या खात्यात पैसे जमा होतील.
– ज्यांचा जनधन खात्यांचा शेवटचा अंक 4 किंवा 5 आहे, त्यांच्या खात्यात 6 मे रोजी पैसे जमा होतील.
– ज्या जनधन खात्यांचा शेवटचा अंक 6 किंवा 7 आहे, 8 मे रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
– ज्या जनधन खात्यांचा शेवटचा अंक 8 किंवा 9 आहे, त्यांच्या खात्यात 9 मे रोजी पैसे जमा केले जाईल.
टाईम टेबलच्या आधारे पैसे काढता येतील.
आता, देशभरात कोरोना व्हायरसचा धाोका लक्षात घेता खबरदारी म्हणून बँकांनी सामाजिक अंतर विचारात घेतले आहे. बँकांनी खातेदारांना त्यांच्या खाते क्रमांकाच्या आधारे टाइम टेबल जारी केले आहे, त्या आधारे लाभार्थी त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढू शकतील. बँकांनी या टाइम टेबलविषयी सांगितले आहे की, ते फक्त या महिन्यासाठीच लागू होतील.
एनपी न्यूज 24 नेटवर्क