नवी दिल्ली : वृत्त संस्था – PPF Limit Hike | केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022-23) सादर होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी काळ शिल्लक राहिला आहे. दरम्यान, चार्टड अकाऊंटंटची संस्था इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया म्हणजे आय. सी. ए. आय (ICAI) ने आपल्या अर्थसंकल्प पूर्व निवेदनात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (Public Provident Fund) स्कीमबाबत शिफारस पाठवली आहे. (PPF Limit Hike)
या अंतर्गत आयसीएआयने म्हटले आहे की, पीपीएफ गुंतवणुकीची कमाल वार्षिक मर्यादा वाढवण्यात यावी. त्यांनी मागणी केली आहे की, सध्याची स्थिती पाहता ठेवीची मर्यादा वाढवून 3 लाख रुपये करावी. सध्याची वार्षिक गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पीपीएफ मर्यादेच्या वाढीवर आय. सी. ए. आय ची शिफारस संसदेत अर्थसंकल्पीय अधिकवेशन सुरू होण्याच्या काही आठवडे अगोदर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच दिवशी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर करतील. (PPF Limit Hike)
आयसीएआयनुसार, पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्याने जीडीपीमध्ये लिमिट सेव्हिंगची भागीदारी वाढवण्यात मदत मिळेल.
काय आहे पीपीएफ स्कीम
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीएफ (Public Provident Fund) एक लोकप्रिय लाँग टर्म गुंतवणूक पर्याय आहे. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्ष आहे.
वर्षभरात यामध्ये कमाल 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.
या खात्यात व्याजदर सरकार वेळोवेळी ठरवते. यामध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळते. शिवाय पीपीएफ EEE (Exempt- Exempt- Exempt) कॅटेगरी अंतर्गत येते म्हणजे मॅच्युरिटीवर जे पैसे मिळतात ते सुद्धा करमुक्त असतात.
Web Title : PPF Limit Hike | ppf limit to be hiked to rs 3 lakh soon
all you need to know.