नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस (post office) अनेक वेगवेगळ्या योजना ग्राहकांसाठी आखत असते. ग्राहकांसाठी अशा योजना अधिक लाभदायक ठरत असतात. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून पोस्ट ऑफिसची योजना ग्राहकांसाठी उपयुक्त असते. तर आता पोस्ट ऑफिस पीपीएफ (PPF) अकाऊंट या खात्यातील सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे यामध्ये ग्राहकांचे पैसे संपूर्ण हमीसह वाढतात, आणि कर सवलत सुद्धा दिली जाते. ग्राहकाच्या सेवानिवृत्तीसाठी ही पोस्ट ऑफिसची खास योजना एक उत्तम मार्ग असू शकते.
कालावधी दर आणखी ५ वर्षांसाठी वाढवता येते –
सध्या PPF खात्याचा कालावधी हा १५ वर्षांचा असतो तर ग्राहक आपल्या मर्जीनुसार ५ वर्षासाठी वाढवून घेऊ शकतो. तसेच त्या योजनेमध्ये आपले असलेले योगदान चालू ठेवायचे व नाही हे फिक्स करू शकतो. ही योजना खासकरून जे खासगी नोकरी करतात आणि ज्यांना सेवानिवृत्तीनंतर काही पैसे मिळणार नाहीत, अशांसाठी खूप उत्तम पर्याय आहे तसेच या योजनेच्या माध्यमातून ग्राहक आपली सेवानिवृत्तीची रक्कम स्वतः तयार करू शकतो.
या योजनेतून २९ लाखांचा निधी मिळतोय –
PPF कॅल्क्युलेटरनुसार ग्राहकाने प्रतिमहिना PPF खात्यात ९ हजार एवढी रक्कम जॅम केली आणि १५ वर्षानंतर त्याला २९,२९,१११ इतके रुपये मिळतील तसेच, यासोबत प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कराचा फायदा आहे. योजनेत गुंतविलेल्या रकमेवर साधारण १.५ लाख रुपयांपर्यंतची कपात केली जाऊ शकते. PPF मधील व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम हे दोन्ही कर वजा करण्या योग्य असणार आहेत.
या योजनेनुसार पैशाची पूर्णपणे हमी –
पोस्ट ऑफिसचे PPF अकाऊंट ही केंद्र सरकारच्या माध्यमातून समर्थित लहान बचत योजनांपैकी एक आहे, जी दीर्घ मुदतीत अधिक नफा देते. आता PPF अकाउंटवर ७.१ % व्याज आहे. हे चलनवाढीपेक्षा अधिक आहे. तसेच ग्राहक कुठल्याही बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF अकाउंट ओपन करू शकते. पोस्ट ऑफिसमध्ये PPF अकाऊंट ओपन करण्याचा फायदा म्हणजे त्यामध्ये मिळविलेल्या व्याजाची सार्वभौम हमी असते, ज्यामुळे ते बँकेच्या व्याजापेक्षा अधिक सुरक्षित होते. या दरम्यान, समजा खाते बंद पडले तरी काळजी करू नये, कारण ग्राहक पुन्हा केवळ ५०० रुपये जमा करून ओपन करू शकता. यासाठी ग्राहकाला पोस्ट ऑफिसमध्ये लेखी अर्ज सादर करावा लागतो. कयामुळे ग्राहकाला कमीतकमी वार्षिक योगदान ५०० रुपये आणि ५० रुपये दंड भरावा लागणार आहे.