बहुजननामा ऑनलाइन – इन्व्हेस्टमेंट करणे एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात नेहमी आपली बचत आपल्या उपयोगी पडते. परंतु व्यक्ती नेहमी या विचारात पडतो की, गुंतवणूक नेमकी कुठे करावी, जेथे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगले रिटर्न मिळेल. मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा स्कीम बाबत, जेथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि सोबतच मॅच्युरिटीवर मिळेल डबल रिटर्न. ही आहे पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना. जाणून घेवूयात याबाबत सर्वकाही…
किसान विकास पत्र भारत सरकारची वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. येथे ठराविक कालावधीत पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आणि मोठ्या बँकेत उपलब्ध आहेत. केव्हीपी भारत सरकारद्वारे जारी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जेथे ठरलेल्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. याचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महीने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1,000 रुपयांची करता येते. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.
कोण करू शकतात गुंतवणूक
किसान विकास पत्रात गुंतवणूक करणार्याचे वय किमान 18 वर्षे असणे जरूरी आहे. यामध्ये सिंगल अकाऊंटशिवाय जॉईंट अकाऊंटसुद्धा काढू शकता. ही योजना अल्पवयीनांसाठी सुद्धा आहे. ज्याची देखरेख पालकांना करावी लागते. ही योजना हिंदू विभक्त कुटुंबांना वगळून ट्रस्टसाठी सुद्धा लागू आहे.
व्याजदर
पोस्ट ऑफिसच्य स्कीममध्ये वार्षिक 6.9 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे 124 महिन्यात (10 वर्षे आणि 4 महिने) डबल होतील. उदाहरणार्थ तुम्ही या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत, तर 124 महिन्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.
ट्रान्सफर करण्याची सुद्धा सुविधा
किसान विकास पत्र जारी करण्याच्या तारखेच्या अडीच वर्षानंतर पूर्तता केली जाऊ शकते. केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा स्थलांतरित करता येते. किसान विकास पत्र एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीला हस्तांतरीत करू शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी करण्यात येते.
असे उघडा खाते
यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून खाते उघडू शकता. याशिवाय फॉर्म आनलाइन सुद्धा डाऊनलोड करता येतो. फॉर्मवर पूर्ण नाव, जन्म तारीख आणि व्यक्तीचा पत्ता लिहावा लागेल. फॉर्ममध्ये पर्चेस अमाऊंटची मात्रा स्पष्ट लिहावी. केव्हीपी फॉर्मची रक्कम रोख किंवा चेकने भरता येते. चेकने पैसे भरल्यास, फॉर्मवर चेकनंबरची माहिती लिहा.