नवी दिल्ली – वृत्त संस्था – Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. यामध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्याचा लोकांना मोठा फायदा होतो. यासोबतच टॅक्स सूट, इन्शुरन्स यासारखे अनेक फायदेही मिळतात. या योजनांमध्ये, कमी मॅच्युरिटी कालावधी ते जास्त मॅच्युरिटी कालावधीचा लाभ दिला जातो. (Post Office Scheme)
तुम्हाला पोस्ट ऑफिस स्कीममध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल आणि जास्त नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही येथील छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करावी. PPF योजना लहान बचत योजनेंतर्गत येते, ज्यामध्ये कोणीही 15 ते 20 रुपये गुंतवू शकतो. यासोबतच या योजनेत कर सूट आणि सुरक्षित गुंतवणुकीचा लाभही उपलब्ध आहे. या योजनेबद्दल जाणून घेऊया…
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Post Office PPF)
पोस्ट ऑफिसचे पीपीएफ खाते ही सुरक्षित योजनांपैकी एक आहे. ही सरकारी योजना असल्याने यामध्ये कोणताही धोका पत्करावा लागत नाही. यामध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 7.1 टक्के व्याजदर दिला जातो.
तिचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु जर तुम्हाला जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही ती आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकता. यामध्ये तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. खाते 1000 रुपयांपासून सुरू होऊ शकते आणि 500 रूपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. (Post Office Scheme)
PPF खाते कोण उघडू शकते
या योजनेअंतर्गत, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कुणीही भारतीय रहिवासी PPF मध्ये खाते उघडू शकतो. या अंतर्गत केवळ एकाच व्यक्तीला खाते उघडण्याची परवानगी आहे तर संयुक्त खाते उघडण्याचा पर्याय दिलेला नाही.
दुसरीकडे, जर एखाद्याला मुलासाठी खाते उघडायचे असेल, तर अल्पवयीन मुलाच्या वतीने पालक पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीनाच्या वतीने PPF खाते उघडू शकतात. याशिवाय अनिवासी भारतीय देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
PPF योजनेत खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे ओळख आणि पत्त्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, एक पासपोर्ट आकाराचा फोटो देखील असावा.
पीपीएफची वैशिष्ट्ये
- एका आर्थिक वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवण्याची परवानगी आहे.
- पीपीएफमध्ये गुंतवलेली मूळ रक्कम, मिळालेले व्याज आणि परिपक्वता रक्कम हे सर्व करमुक्त आहे.
- खाते चालू ठेवण्यासाठी किमान वार्षिक गुंतवणूक 500 रुपये आहे.
- पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यावर वार्षिक 31 मार्च रोजी चक्रवाढ व्याज दिले जाते.
कसे मिळतील 10 लाख रुपये
जर एखाद्याने पोस्ट ऑफिसच्या पीपीएफमध्ये रोजच्या बचतीवर 100 रुपये गुंतवले तर महिन्यात 3000 रुपये होतील, हा फंड वर्षभरात 36,000 रुपये आणि पाच वर्षांत 1,80,000 रुपये असेल.
ज्यावर तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के व्याज देखील दिले जाईल.
म्हणजेच, जर तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 9,76,370 रुपये मिळतील.
Web Title : Post Office Scheme | this post office scheme will give an amount of 10 lakhs on maturity to save of 100 rupees.
Control Overeating By Controlling Your Brain | ‘या’ पध्दतीनं मिळावा खाऊपणावर नियंत्रण, जाणून घ्या