नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना आणत आहे. परंतु, पोस्ट ऑफिसने सेव्हिंग अकाऊंटशी संबंधित काही नियमात बदल केला आहे. ग्राहकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांचे नुकसान होऊ शकते.
डिपार्टमेंट ऑफ पोस्टने पोस्ट ऑफिस अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा 50 रुपयांवरून वाढवून 500 रुपये केली आहे. जर तुमच्या खात्यात किमान 500 रुपये नसतील तर आर्थिक वर्षाच्या अंतिम कामकाजाच्या दिवशी पोस्ट ऑफिस तुमच्याकडून 100 रुपये पेनाल्टी वसूल करेल. असे प्रत्येक वर्षी केले जाईल.
ज्या खात्यांमध्ये झीरो बॅलन्स असेल तर ती खाती आपोआप बंद केली जातील. पोस्ट ऑफिस सध्या व्यक्तिगत, संयुक्त बचत खात्यांवर प्रति वर्ष 4 टक्के व्याज देते. बचत खात्यात किमान बॅलन्स 500 रूपये असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही अजून तुमचे खाते आधारशी लिंक केले नसेल तर तुम्हाला सरकारी सबसिडीचा लाभ मिळणार नाही.
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडल्याने अनेक सुविधा मिळतात. विना-चेक सुविधेच्या खात्यात आवश्यक किमान शिल्लक रक्कम पन्नास रूपये आहे. आर्थिक वर्ष 12-13 पासून मिळवलेल व्याज प्रति वर्ष 10000 रुपयांपर्यंत करमुक्त आहे.
तुम्हाला सरकारी सबसिडीचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटला आधारशी लिंक करावे लागेल. पोस्ट विभागाने याबाबतीत एक सक्युर्लर जारी केले आहे. पोस्ट विभागाकडून जारी सक्युर्लरमध्ये म्हटले आहे की, लोक आपल्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर (डीबीटी) चा लाभ घेऊ शकतात. सोबतच आधार लिंक करण्याचा कॉलम सहभागी केला आहे. हा कॉलम खाते उघडण्याचे अॅप्लीकेशन किंवा परचेस ऑफ सर्टिफिकेट फॉर्ममध्ये दिसेल.