नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office RD Scheme | पोस्ट ऑफिस (Post Office RD Scheme) च्या रिकरिंग डिपॉजिट (Recurring Deposit) योजनेत तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो. शिवाय कमी पैशात सुद्धा गुंतवणुक करू शकता. पैसे सुद्धा सुरक्षित राहतात. यामध्ये तुम्ही 100 रुपये महिना गुंतवणुक करू शकता. जास्तीत जास्त कोणतेही लिमिट नाही, तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसचे RD डिपॉझिट अकाऊंट चांगल्या व्याजदरासह छोट्या हप्त्यात बचत करण्याची सुविधा देते.
जाणून घ्या किती मिळेल व्याज ?
पोस्ट ऑफिसमध्ये जे RD अकाऊंट ओपन होते ते 5 वर्षासाठी असते. यापेक्षा कमी कालावधीसाठी हे खाते नाही. दर तिमाही (वार्षिक रेटने) जमा रक्कमेवर व्याजाचे कॅलक्युलेशन केले जाते. नंतर ते दर तिमाहीच्या अखेरीस तुमच्या अकाऊंटमध्ये चक्रवाढ व्याजासह (compound interest) जोडले जाते.
इंडिया पोस्ट ऑफिसच्या (Post Office) वेबसाईटनुसार, RD स्कीमवर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला आपल्या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये (small saving schemes) व्याजाची घोषणा करते.
10 हजार रुपये गुंतवल्यास मिळतील 16 लाख
जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.
आरडी अकाऊंटची वैशिष्ट्ये
जर तुम्ही वेळेवर आरडीचा हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
हप्त्याला उशीर झाल्यास दरमहिना एक टक्क दंड भरावा लागेल.
सोबतच जर तुम्ही लागोपाठ 4 हप्ते भरले नाही तर अकाऊंट बंद होईल.
मात्र अकाऊंट बंद झाल्यास ते पुढील 2 महिन्यासाठी पुन्हा अॅक्टिव्हेट करता येऊ शकते.
Web Title : post office rd scheme post office rd scheme invest 10k and get 16 lakh rupees benefits
Dhaagasutra | कस्टमाईज क्लोथिंगचा युनिक अनुभव देणारे ‘धागासूत्र’ पुणेकरांच्या सेवेत रुजू