नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आणि पोस्ट ऑफिस (Post Office) यांच्यातील नाते हे विश्वासाचे आहे. बॅंकेपेक्षा कमी व्याज मिळाले तरी चालेल पण पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक पोस्टात गुंतवणूकीस प्राधान्य देतात. गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसने (Post Office) एक जबरदस्त योजना आणली आहे. या योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील अन् त्यानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन Pension स्वरुपात व्याजाचे पैसे मिळतील. तसेच तुम्ही जमा केलेली एकरकमी रक्कम मॅच्युरिटीनंतर परत मिळणार आहे.
Post offices super hit scheme just deposit rs 50000 you will get rs 3300 in Form of Pension
Post Office Monthly Income Scheme Account (MIS) असे या पोस्टाच्या नव्या योजनेचे नाव आहे.
या योजनेचा मुदत कालावधी 5 वर्ष आहे.
या योजनेअंतर्गत तुम्हाला एकरकमी 50 हजार भरावे लागतील.
त्यानंतर दरवर्षाला तुम्हाला व्याज स्वरुपात 3 हजार 300 रुपये मिळतील.
या योजनेत किमान 1000 अन् 100 च्या पटीत पैसे जमा करता येईल.
तर जास्तीत जास्त साडेचार लाखांपर्यंतची रक्कम तुम्हाला गुंतवता येऊ शकते. तर संयुक्त खात्यासाठीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये इतकी आहे.
या योजनेत कमीत कमी 1 हजार जमा करता येणार असून एका व्यक्तीसाठी 4.5 लाखाची मर्यादा आहे.
तर सध्याचा व्याज दर 6.6 टक्के इतका आहे.
एमआयएस कॅल्क्लुलेटरच्या मते जर कुणी या खात्यात एकरकमी 50 हजार जमा केल्यास दरमहा 275 रुपये प्रमाणे 5 वर्षांसाठी प्रत्येक वर्षी 3.300 रुपये मिळतील.
म्हणजेच 5 वर्षात 16,500 रुपये व्याज स्वरुपात मिळकत होईल.
त्याचपद्धतीने 1 लाख जमा केले तर तुम्हाला 5 वर्षात 33 हजार अतिरिक्त मिळकत मिळते.
जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 2, 475 रुपये एका वर्षात 29 हजार 700 रुपये आणि 5 वर्षांत व्याज स्वरुपात तुम्हाला 1 लाख 48 हजार 500 रुपये मिळणार आहेत.
Web Titel : Post offices super hit scheme just deposit rs 50000 you will get rs 3300 in Form of Pension
Earn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल ‘मालामाल’, मिळतील पूर्ण एक लाख रुपये; जाणून घ्या कसे