मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पारंपरिक इंधनाला पर्याय आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. विजेवर चालणारी वाहने यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शोधले जात आहेत. सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांवरील जीएसची १२ टक्क्यांवरून ५ टक्के केले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्या सरसावल्या आहेत. पोर्श कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. २०२० पर्यंत पोर्श ‘टेकन’ ही नवी इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत दाखल होईल.
पोर्श इंडियाचे संचालक पवन शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘पोर्श इंडियाने ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक गाड्यांना चार्जिंगची सुविधा देण्यासाठी स्थानिक फाइव्ह स्टार हॉटेलसोबत करार केला आहे. सप्टेंबरपर्यंत ‘टेकन’ परदेशात लाँच होईल. भारतात मे २०२० पर्यंत कार लाँच करण्यात येईल. ‘
पोर्श ‘टेकन’ इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये –
पोर्श कंपनी भारतात ही कार सीबीयू (कम्प्लीट बिल्ट युनिट)च्या रूपात इम्पोर्ट करणार आहे.
इलेक्ट्रिक कार ‘टेकन’ ८०० वोल्ट आर्किटेक्चरवर बनवली आहे. त्यामुळे ती लवकर चार्ज होणार आहे.
४ मिनिटं चार्ज केल्यानंतरही कार १०० किमीपर्यंतचं अंतर गाठू शकणार आहे.
ही कार एकदा पूर्ण चार्ज केली की ५०० कि.मी.पर्यंत धावू शकेल असा दावा कंपनीने केला आहे.