मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडियावर अश्लील मजकूर शेअर करणे हा सायबर ऍक्ट नुसार गुन्हा आहे. पण आजही असे प्रकार सर्रास होताना दिसतात. या संबंधातील एक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. मुबई येथे हा प्रकार घडला आहे. एका शिक्षकाने शिक्षकांच्याच व्हाट्स अप ग्रुप वर अश्लील व्हिडीओ शेअर केले आहेत. या ग्रुप मध्ये महिला देखील आहेत. त्यांनी या शिक्षकाबाबत नागरसेवकांकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार शिक्षण विभागाला केली. शिक्षण समिती अध्यक्षांनी या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हा शिक्षक स्वतःच्या घरातच रामदेव बाबा प्रमाणे छोटसं धोतर नेसून योगासन करत होता आणि तोच VIDEO त्याने शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट केला मुख्य म्हणजे या ग्रुप मध्ये इतर महिला शिक्षिका ही आहेत. याच महिला शिक्षकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. पण हा आक्षेप केवळ योगासनाच्या व्हिडिओसाठी नाही. तर हा शिक्षक अनेक अश्लील व्हिडिओ शिक्षकांच्या या ग्रुप वर टाकत असे. वारंवार सांगूनही या शिक्षकाने असे आंबट शौकिन व्हिडिओ ग्रुप वर टाकणे थांबवले नाही. तेव्हा शिक्षकांनी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्याकडे तक्रार केली मंगेश सातमकर यांनीही शिक्षण विभागाला या शिक्षकावर कारवाई करण्यास सांगितले. परंतु दोन वेळा तक्रार करूनही पालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाई केली नाही.
अखेर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न शिक्षण समितीमध्ये उपस्थित झाला तेव्हा सातमकरांनी हा विषय शिक्षण समिती सभेत उपस्थित केला. तेव्हा शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी संबंधित शिक्षकाला चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हे चौकशी झाल्या नंतर या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी मधून बडतर्फ केलं जाईल अशी माहिती अंजली नाईक यांनी दिली आहे. सोबतच या शिक्षकावर यापूर्वी असे वर्तन करण्याचे आरोप आहेत का हेही तपासले जाईल मुख्य म्हणजे हा विषय शिक्षण समितीमध्ये मांडणाऱ्या नगरसेवक मंगेश सातमकर यांनी विद्यार्थ्यांकडून या शिक्षकाविषयी अशी कुठलीही तक्रार आली नसल्याचं सांगितलं आहे.