मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत. दरम्यान आता पूजा हिचं भाजपसोबत काय कनेक्शन होत याचा खुलासा तिचे वडिल लहू चव्हाण यांनी केला आहे. पूजा 3 वर्षे भाजपची कार्यकर्ता होती. तिथं कोणी काही विचारत नव्हतं. नेमकं काय झालं मला माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं आहे.
निवेदनात काय म्हणाले लहू चव्हाण ?
पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी या निवेदनात लिहिलं की, पूजा कर्जबाजारी होती. त्यामुळं तिची मनस्थिती चांगली नव्हती. ती चक्कर येऊन खाली पडली. त्याचा संजय राठोड यांच्याशी काहीही संबंध नाही. विरोधी पक्ष नाहक संजय राठोड यांची बदनामी करत आहे. त्यामुळं संजय राठोडांचा राजीनामा स्विकारू नये. हे सगळं थांबवलं पाहिजे. पूजा सोबत अरूणचं नाव जोडणं चुकीचं आहे. त्याचा काहीही संबंध नाही. नुसती बदनामी सुरू आहे. कोणीही माझी फोन करून विचारपूस करत नाही. सत्य समोर आल्यावरच सर्वांनी बोललं पाहिजे.
पूजा चव्हाण भाजपमध्ये होती
पूजाचं फेसबुक अकाऊंट तपासलं असता, ती भाजपच्या बंजारा युवती आघाडीची पदाधिकारी असल्याचं दिसून येतं. तसंच बीड लोकसभा निवडणुकीत खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत प्रचार करतानाचेही तिचे काही फोटो आहेत. त्यामळं पूजा ही भाजपची कार्यकर्ता होती हे स्पष्ट आहे.