बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस पूजा बेदी (Pooja Bedi) ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी आणि प्रसिद्ध नृत्यांगणा, मॉडेल प्रोतिमा बेदी यांची लेक आहे. पूजा आपल्या खासगी लाईफमुळं आणि काही वादग्रस्त कामांमुळंही जास्त चर्चेत राहिली आहे. तिची लव्ह लाईफही खूप चर्चेचा विषय ठरली होती. तिनं केलेली एक जाहिरातही अशीच होती ज्यामुळं खूप वाद झाला होता आणि तिच्यावर टीका झाली होती.
अनेक बोल्ड सीन्स, किसिंग सीन्स, कामसूत्रची जाहिरात यामुळं पूजा खूप फेमस झाली होती. 90 च्या दशकात पूजानं केलेल्या कंडोमच्या जाहिरीतीची जोरदार चर्चा झाली. पूजानं केलेली ही कामसूत्रची जाहिरात खूप वादग्रस्त ठरली होती. तिच्यासोबत कंडोमच्या जाहिरातीमध्ये मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. ही जाहिरात दूरदर्शनर बॅन करण्यात आली होती. इतरही अनेक चॅनल्स असे होते ज्यांनी ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता. त्यावेळी पूजावर जोरदार टीका झाली होती.
View this post on Instagram
खास बात अशी की, त्यावेळी कंडोमची जाहिरात करणारी ती पहिली अभिनेत्री होती. कारण अशी जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार होत नव्हती. अशात पूजानं ही जाहिरात करण्याचं धाडस दाखवलं होतं. पूजा बेदी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि सेक्स या विषयांवरील तिच्या बोल्ड विधानांमुळं ओळखली जाते.
View this post on Instagram
पूजाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1994 मध्ये जवळपास साडे तीन वर्ष डेट केल्यानंतर तिनं फरहान फर्निचरवाला सोबत लग्न केलं होतं. तिनं त्याच्यासाठी इस्लाम धर्मही स्विकारला होता. परंतु हे नातं जास्त काळ टिकलं नाही. 12 वर्षांनंतर दोघं वेगळे झाले. पूजानं फरहान फर्निचरवालापासून 2003 साली घटस्फोट घेतला होता. आता याला 18 वर्षे झाली आहेत. तिला या लग्नापासून दोन मुलं आहेत. मुलीचं नाव अलाया आणि मुलाचं ओमर आहे. तिची मुलगी अलाया हीदेखील अॅक्ट्रेस आहे. तिनं सैफ अली खान सोबत जवानी जानेमन सिनेमातून डेब्यू केला आहे.
View this post on Instagram
पूजा बेदीनं बॉयफ्रेंड मानेक कॉन्ट्रॅक्टर सोबत वयाच्या 47 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. पूजा तब्बल 5 पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली. परंतु अखेर मानेक सोबत तिनं संसार थाटला. तिच्या या लग्नाचीही खूप चर्चा झाली होती.
View this post on Instagram
पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 1991 साली आलेला विषकन्या हा तिचा पहिला सिनेमा आहे. 1992 साली पूजानं जो जीता वही सिकंदर या सनेमातही काम केलं आहे. या सिनेमानं तिला खरी ओळख मिळाली. या सिनेमात पूजानं आमिर खानला लिपलॉक किस केला होता. या सिनेमात पूजानं रेड हॉट फ्लेवर्ड ड्रेस घालून पूर्ण लाईमलाईट आपल्या नावावर केली होती. यानंतर तिचा कोणताही सिनेमा चालला नाही. या सिनेमानंतर तिनं लुटेरे, फिर तेरी कहानी याद आए, आतंक ही आतंक, शक्ति अशा अनेक सिनेमात काम केलं. पूजानं टीव्ही इंडस्ट्रीतही काम केलं आहे. बिग बॉस 5 मध्येही ती दिसली आहे. अनेक जाहिरातीमध्ये देखील ती झळकली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram