कल्याण : बहुजननामा ऑनलाइन – Policeman Murder News | मुलगी नांदायला सासरी जात नाही यावरून झालेल्या वादामुळे मुलगी आणि पत्नीने पोलीस हवालदार (Police Havaldar) असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस (Kalyan Crime) आले आहे. ही घटना पूर्वेकडील नाना पेशवे चौक भागात गुरुवारी रात्री घडली. प्रकाश राजाराम बोरसे (Prakash Rajaram Borse) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून याप्रकरणी पत्नी ज्योती (Jyoti) आणि मुलगी भाग्यश्री (Bhagyashree) या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police) अटक (Arrested) केली आहे. (Policeman Murder News)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश बोरसे हे मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात (Kurla Police Station) कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी कामावरुन ते घरी परतले. नवऱ्याबरोबर पटत नसल्यामुळे मुलगी भाग्यश्री आई वडिलांकडेच राहते. ती नांदायला जात नाही म्हणून बोरसे यांच्या घरात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, पत्नी ज्योती आणि भाग्यश्री हिने घरातील खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात प्रकाश हे जागीच कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू (Died) झाला. (Kalyan Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख (Senior Police Inspector Bashir Shaikh) यांनी घटनास्थळी पथक रवाना केले. घटनास्थळी पोलीस आले असता त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचे आढळले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर मृतदेहाशेजारी माय-लेकी बसलेल्या आढळून आले. त्या दोघींनाही पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Policeman Murder News)
Web Title :- Policeman Murder News | dispute over daughter murder police havaldar stabbing him head
Pune Crime | चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 3 लाखांचा ऐवज केला लंपास
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव