अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – Police Officer Suicide | अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे (fejarpure)पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दिवसाढवळ्या गळफास घेऊन आत्महत्या (Police Officer Suicide) केली. या घटनेमुळे अमरावती पोलीस दलात (Amravati Police Force) एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे (psi anil mule) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात गुरुवारी दोन खुनाच्या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी (दि.13) पोलीस उपनिरीक्षक मुळे यांच्या आत्महत्येने शहर हदरुन गेले आहे. अनिल मुळे हे कठोरा रहाटगाव, रिंग रोड परिसरातील आकार अपार्टमेंट येथे वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरापासून गोल्डन लिफ मंगल कार्यालयासमोरील लेआऊट मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अनिल मुळे यांच्या आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकले नाही.
या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात (Nandgaon Peth Police Station) नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.
अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसऱ्यांदा राजापेठ पोलिस ठाण्यात त्यानंतर फ्रजरपुरा येथे कार्यरत होते.
ते गेल्या 6 महिन्यापासून ड्युटीवर सातत्याने गैरहजर होते. तसेच मानसिक तणावात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्त आरती सिंग (Commissioner of Police Aarti Singh, Deputy),
पोलीस उपायुक्त शशिकांत सातव (Commissioner of Police Shashikant Satav),
सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड (Assistant Commissioner of Police Bharat Gaikwad), नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
मोरे यांची कार आत्महत्या केलेल्या घटनास्थळापासून 50 फूट अंतरावर उभी होती.
तर कारचीचावी त्यांच्या खिशात होती.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
Web Title :- Police Officer Suicide | psi anil mule committed suicide by hanging himself on the side of the road at amravati
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rain in Maharashtra | विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी