वाशिंग्टन : वृत्तसंस्था – एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने कृष्णवर्णीय महिलेला तिच्याच घरात घुसून गोळी मारली. यानंतर 28 वर्षीय महिलेचा मृ्त्यू झाला. एटाटिआना कोकीस जेफरसन असं या महिलेचं नाव आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील ही घटना आहे. सध्या त्या पोलीस अधिकाऱ्याला सुट्टीवर पाठवण्यात आलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
एका रिपोर्टनुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका शेजारी राहणाऱ्याने दरवाजा उघडा असल्याने आपत्कालीन नंबरवर फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर एका अधिकाऱ्याला तपासासाठी पाठवण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळची आहे. दरम्यान आरोपी पोलीस अधिकाऱ्याची ओळख पटली आहे. 62 वर्षीय शेजारी जेम्सने सांगितले की, त्याने जेफरसनच्या घराचा दरवाजा रात्री 2.25 वाजता उघडाच असल्याचे पाहिले. यानंतर त्याने याबाबत सूचना दिली.
जेम्सने सांगिले की, दरवाजा उघडा असल्याने त्याला संशय आला. कारण 8 वर्षांच्या पुतणीसोबत जेफरसनने घरात असायला हवं होतं. त्याचं म्हणणं आहे की, त्याला दोषी असल्याचं वाटत आहे. कारण त्याने फोन केला नसता ती महिला जिवंत असली असती. पोलिसांनी एक व्हिडीओ फूटेज रिलीज केलं आहे. यात दिसतंय की, पोलीस म्हणत आहेत हाथ वर कर. यानंतर पोलीस गोळी झाडत आहे.”
Visit : bahujannama.com