नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Police News | पंजाबमध्ये एका पोलीस कर्मचार्याला (Police News) कार चालकाने चिरडले. घटना पटियालाची आहे. सुरक्षा तपासणी दरम्यान पोलीस कर्मचार्याला एका कार चालकाने निशाणा बनवले. या संपूर्ण घटनेचा एक भितीदायक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
व्हिडिओत दिसत आहे की, पोलीस कर्मचारी कारच्या अगदी समोर उभा आहे.
अचानक कार चालक आपली गाडी सुरू करतो आणि नंतर पोलीस कर्मचार्याला आपल्या कारने फरफटत नेतो.
व्हिडिओत दिसत आहे की, कार चालक काही अंतरापर्यंत पोलीस कर्मचार्याला फरफटत नेतो आणि नंतर त्यास चिरडत निघून जातो.
कारच्या खाली चिरडला गेल्याने पोलीस कर्मचारी जखमी होतो.
खुलेआम रस्त्यावर झालेल्या या घटनेचा व्हिडिओ भितीदायक आहे.
#WATCH Car evading security check hits police personnel in Patiala, Punjab
Police say the injured police personnel is under medical treatment, car traced, further investigation underway
(Video source: Police) pic.twitter.com/ZF9wygy8Xm
— ANI (@ANI) August 14, 2021
या घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर शहराचे उप पोलीस अधीक्षक हेमंत शर्मा यांनी म्हटले की, चेकिंगपासून वाचण्यसाठी या कार चालकाने पोलीस कर्मचार्याच्या अंगावर गाडी घातली.
या घटनेत जखमी पोलीस कर्मचार्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलीसांनी कारबाबत माहिती मिळवली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वाहनांची तपासणी सुरू होती.
या दरम्यान एका पांढर्या रंगाच्या कारला पोलिसांनी थांबवले.
परंतु चेकिंगपासून वाचण्यासाठी या कार चालकाने पोलीस कर्मचार्याला चिरडले आणि तेथून फरार झाला.
Web Title : Police News | punjab car evading security check hits police personnel in patiala video viral
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update