पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – हिंजवडी परिसरातील उच्चभ्रू वसाहत असणाऱ्या ‘फ्लॅट’वर दिल्लीच्या ‘मॉडेल’कडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
‘एजंट’सह पाचजणांना अटक करुन चार मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. ही कारवाई लाईफ बिल्डींग, कोलते पाटील सोसायटी, मारुंजी येथे गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली आहे. आयर्न उर्फ़ बळीराम सवरगावकर (34, रा. लाईफ बिल्डींग, कोलते पाटील सोसायटी, मारुंजी), नितिन शरद भालेराव (25, रा. लातूर), अभय सज्जनराव शिंदे (25, रा. लातूर), मयूर गणेश शर्मा (24, रा. भोपाळ) आणि दिलीप भागीरथ मंडल (24, रा. पालघर) या पाच जणाना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाईफ बिल्डींग, कोलते पाटील सोसायटी, मारुंजी येथे एका फ्लॅटवर बाहेरून मूली आणून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारे, अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथे चार मूली आणि पाच मुले आढळून आली. पोलिसांनी माहिती घेतली असता यातील दोन मूली दिल्ली येथील असून त्या मॉडेलिंग करतात. पैश्यासाठी एजंट अश्या प्रकारच्या मॉडेल तसेच मूली ग्राहकांना पुरवत असल्याचे स्पस्ट झाले. यावरून मुलींची रवानगी सुधारग्रहात करुन पाच जणांना अटक केली. हिंजवडी, वाकड परिसरात हाय प्रोफाइल तसेच लोकल सेक्स रॅकेट सुरू आहेत.