पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – लग्नाचे आमिष दाखवून, जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 2016 ते 2018 या कालावधीत वडमुखवाडी च-होली आळंदी या ठिकाणी घडली.
शुभम गजानन मोहिते (रा. पाटील नगर, धनकवडी) असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2016 ते 2018 या कालावधीत शुभम याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाची मागणी घातली. त्यासाठी महिलेने नकार दिला.
शुभम याने आपल्यासोबत लग्न न केल्यास महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून महिलेशी जवळीक करत शरीरसंबंध प्रस्थापित केला. त्यानंतर महिलेने शुभमकडे लग्नाची मागणी केली. मात्र शुभम याने यास साफ नकार दिला.महिलेने याबाबत तक्रार केल्यास तिचे वडील आणि बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याची धमकी दिली. दिघी पोलिसांनी बलात्कार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Visit : bahujannama.com