छत्तीसगड : बहुजननामा ऑनलाइन – आपण चित्रपटात पाहतो कि, आपल्याच जवळची एकादी व्यक्ती आपली दुश्मन म्हणून समोर उभी असते. त्यात नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकी काही नवीन नाहीत. अशीच एक घटना छत्तीसगड घटना सुकमा जिल्यात घडली आहे. जेव्हा एका पोलिसाने नक्षलवाद्यांच्या कॅम्प वर हल्ला चढविला. तेव्हा त्याची स्वतःची बहीण त्याच्या समोर बंदूक घेऊन समोर आली. हे सगळी घटना कोणत्या चित्रपटाच्या गोष्टींपेका कमी नाही. परंतु ह्या दोघा भाऊ-बहिणीची हि गोष्ट खरी आहे.
दरम्यान, सुकमा जिल्यात एक नक्षली कॅम्प असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना समजली , त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी बालेंगटोंग जंगलात नक्षलांच्या कॅम्प वर धाड टाकली. इतक्यात नक्षलवाद्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी वेट्टी कन्नी (वय ५० ) समोर आली आणि दुसऱ्या बाजूने सुरक्षा रक्षकांसोबत तिचा भाऊ वेट्टी रामा (वय ४३) उभा होता.
आपल्या बहिणीला समोर पाहताच रामा जरा वेळ आशचर्यचकित झाला, पण आपले कर्तव्य बजावत त्याने विरोध करण्यास सुरुवात केली, दोन्ही बाजूने गोळीबारास सुरुवात झाली. त्या चमकीत दोन नाक्षवादी ठार झाले, कन्नी तेथून पळ काढण्यास यशस्वी झाली. सुरक्षा रक्षकांच्या १४० जणांनी हा हल्ला चढविला होता.
वेट्टी रामा आणि वेट्टी कन्नी हे दोघे भाऊ बहीण एकेकाळी नक्षलवाद्यांसाठी काम करत होते, परंतु मागील वर्षी रामा याने पोलिसांना स्वाधीन होऊन, सुरक्षा रक्षकांनचा गुप्त हेर म्हणून काम करत आहे. त्याने कन्नी ला देखील सगळे सोडण्यास सांगितले होते, पण तिने ऐकले नाही. त्याने तिला चेतावणी देखील केली होती, जर आपण कधी समोरा-समोर आलो तर, मी गोळ्या घालायला कमी करणार नाही.
सुकमा जिल्याचे पोलीस अधीक्षक सलभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन नक्षलवादी मारले गेले असून, बरचसे नक्षली सामान देखील मिळाले आहे.