शिक्रापुर / प्रतिनिधी( सचिन धुमाळ) : बहुजननामा ऑनलाईन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील बजरंगवाडी परिसरात बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेत त्याच्याकडून चार रेमडीसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.या प्रकरणी अमित देविदास पवार यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिक्रापूर ता. शिरूर येथील बजरंगवाडी परिसरात एक युवक बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार अमरदिन चमनशेख, पोलीस शिपाई मिलिंद देवरे, किशोर शिवणकर, लक्ष्मण शिरसकर, निखिल रावडे, अमोल दांडगे, जयराज देवकर यांसह आदींनी बजरंग वाडी परिसरात जात सापळा लावला असता त्यांना एक संशयित युवक आलेला दिसून आला त्यावेळी पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे दिली यावेळी पोलिसांनी त्याचे जवळील पिशवीत तपासणी केली असता तब्बल चार रेमडीसिवीर इंजेक्शन मिळून आले.
यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याचे जवळील चार रेमडीसिवीर इंजेक्शन जप्त केले असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर (रा.शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून दिली असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.