पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई
बहुजननामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे बैलगाडा शर्यत(bullock cart race) भरवल्या व गर्दी करून कोरोना आजार पसरवण्यात मदत केली या प्रकरणी सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे. सासवड पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर प्राण्यांना(bullock cart race) निर्दयपणे वागवले बाबत गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुरंदर तालुक्यातील वनपुरी आणि कुंभारवळण या गावच्या सीमेवर वनपुरी गावच्या हद्दीमध्ये गट नंबर २५० मध्ये मच्छिंद्र उर्फ बाबा हरिश्चंद्र जगताप राहणार ताथेवाडी सुनील तानाजी कुंभारकर राहणार वनपुरी, चंद्रकांत प्रकाश शिंदे राहणार ताथेवाडी, शुभम राजेंद्र जगताप राहणार तरटेमळा सासवड, (सर्वजन पुरंदर तालुक्यातील आहेत) यांनी विनापरवाना बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करुन शर्यतीच्या निर्बंधां बाबत आदेशाचे उल्लंघन केले.
त्याच बरोबर बैलांना शर्यतीसाठी पळवून त्यांना क्रूरतेने वागणूक दिली. त्याच बरोबर या आयोजनामुळे बघ्यांची शेकडोंच्या संख्येने गर्दी जमून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सामाजिक आंतर पाळण्याचे शासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. कोरोना पसरविण्यासाठी साठी मदत केल्याचे म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याबाबतचे व्हिडिओ सुद्धा पोलिसांना उपलब्ध झालेले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांन विरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८/२००/ ७९ प्राण्यांना निर्दय पणे वागवले प्रतिबंधक कायदा कलम ११ प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक डी.एस.हाके हे करीत आहेत. पुरंदर तालुक्यात घडलेली ही पंधरा दिवसातील दुसरी घटना आहे. यापूर्वी पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील कर्नलवाडी गावात सुद्धा अशाच प्रकारे बैलगाड्यांची शर्यत भरण्यात आली होती. यावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. न्यायालयाचा बंदी हुकूम असतानासुद्धा अशाप्रकारे बैलगाडा शर्यती भरून सर्रासपणे न्यायालयाचे हुकुम मोडण्याचे काम बैलगाडी स्पर्धा आयोजकांकडून होत आहे.
Comments are closed.