इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – इंदापूर शहरात राजरोसपणे हाॅटेल उघडे ठेवुन गर्दी करत खाद्यपदार्थ विक्री करून जिल्हाधीकारी पूणे यांचे यादेशाचा भंग करणार्या दोन बड्या हाॅटेल मालकावर व हाॅटेलवर इंदापूर पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारून फौजदारी गुन्हे दाखल केल्याने इंदापूर शहर व परीसरामधील हाॅटेल व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.
उदय सदाशिव देशपांडे (हाॅटेल देशपांडे व्हेज महात्मा फुले सर्कल टेंभुर्णी नाका – रा. अंबिकानगर इंदापूर,जि.पूणे) व सुर्यकांत दगडु जाधव (हाटेल गीरजाई, बाबा चौक – रा.४० फुटी रोड इंदापूर,जि.पूणे) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर याबाबतची फिर्याद पो.काँ. आमोल रामदास गारूडी व पो.काँ. संजय बबन कोठावळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
रविवार दि ४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते १०:४५ वा. चे दरम्यान त्यांचे स्व मालकीची हाॅटेल्स उघडी ठेवली व हाॅटेलमध्ये गर्दी जमवुन खाद्य पदार्थ विक्री सुरू ठेवुन जिल्हाधीकारी पूणे यांनी लागु केलेले जमावबंदी व कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्याने वरील दोन हाॅटेल मालकावर महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय साथ रोग कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कारवाई केली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.