मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरूद्ध फोनवर झालेल्या चर्चेवरून एका कवी-कार्यकर्त्याला एका उबर कॅब ड्रायव्हरने बुधवारी रात्री पोलीस ठाण्यात पोहचवले. ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी गुरूवारी या घटनेबाबत ट्विट केले जे कवी-कार्यकर्ता बप्पादित्य सरकार यांच्याशी संबंधित होते. या घटनेनंतर बप्पादित्य सरकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. कृष्णन यांनी बप्पादित्य यांच्या बाबत केलेल्या त्या ट्विटनुसार, बप्पादित्य सरकार यांनी बुधवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता जुहू ते कुर्लासाठी उबर कॅब केली. हा प्रवास करताना ते मोबाईलवर आपल्या मित्राशी दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनामध्ये लाल सलाम घोषणेच्या अडकाठी बाबत बोलत होते. ही चर्चा ऐकत असलेल्या ड्रायव्हरने कॅब थांबवली आणि त्याने सांगितले की त्याला एटीएममधून पैसे काढायचे आहेत.
ड्रायव्हर जेव्हा परतला तेव्हा त्याच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी होते, त्यांनी बप्पादित्य यांना विचारले की त्यांच्याकडे डफली का आहे. तसेच त्यांचा पत्ताही विचारला. कृष्णन यांनी केलेल्या ट्विटनुसार बप्पादित्य यांनी पोलीस कर्मचार्याला सांगितले की, मी जयपूरचा असून मुंबई बागमध्ये सुरू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनात गेलो होतो. ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले की, बप्पादित्यला ताब्यात घ्या कारण तो म्हणत होता की तो कम्युनिस्ट आहे आणि देश जाळण्याबाबत बोलत होता. कॅब चालकाने हा सुद्धा दावा केला की त्याने फोनवर सुरू असलेली सर्व चर्चा रेकॉर्ड केली आहे.
आम्ही शांत बसून तुम्हाला पाहू ….
निवेदनात म्हटले आहे यानंतर बप्पादित्य यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ट्विटमध्ये पोलीस ठाण्याच्या नावाचा उल्लेख नाही. बप्पादित्य यांनी पोलिसांना चर्चा ऐकण्याचा आग्रह केला, जेणेकरून ड्रायव्हरच्या दाव्या बाबत त्यांना खरे काय ते समजावे. या उबर ड्रायव्हरने कवी-कार्यकर्त्याला म्हटले की, तुम्ही लोक देशाला बरबाद कराल आणि तुम्हाला असं वाटतं का की, आम्ही शांत बसून बघत बसू.
Last night, poet @Bappadittoh had a scary episode in Mumbai, at the hands of an @Uber driver and @MumbaiPolice cops (see screenshots): a glimpse of scary India under NPR NRC CAA, where every person will be incentivised to suspect & turn in others & police can harass everyone. pic.twitter.com/OOKUB58BxK
— Kavita Krishnan (@kavita_krishnan) February 6, 2020
या उबर कॅब ड्रायव्हरने म्हटले की, बप्पादित्यने त्याचे आभार मानले पाहिजेत की तो पोलीस ठाण्यात घेऊन गेला, अन्य ठिकाणी घेऊन गेला नाही. ट्विटमध्ये म्हटले आहे की, पोलीस कवीसोबत नरमाईने वागले आणि कवी आणि ड्रायव्हरला त्यांचे जबाब द्यायला सांगितले. रात्री सुमारे एक वाजता कम्युनिस्ट कार्यकर्ते एस गोहिल पोलीस ठाण्यात आल्यानंतर सरकार यांना जाऊ देण्यात आले. कृष्णन यांनी केलेल्या ट्विटनुसार पोलिसांनी बप्पादित्य यांना सल्ला दिला की, त्यांनी डफली सोबत ठेवू नये तसेच लाल स्कार्फ वापरू नये. कारण वातावरण खराब आहे आणि काहीही होऊ शकते. कविता कृष्णन यांनी हे ट्विट मुंबई पोलीस आणि उबरलाही टॅग केले आहे. ट्विटर हँडल उबर इंडिया सपोर्टने म्हटले की घटना चिंताजनक आहे. आम्ही प्राथमिकतेच्या आधारावर याचे समाधान करू.