नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान जन धन योजना ही पंतप्रधान मोदींच्या विशेष आणि महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक मानली जाते. या योजनेंतर्गत देशातील गरिबांचे खाते विनामूल्य उघडले जाते. नुकतीच वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) एका ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की पंतप्रधान जन धन योजने (पीएमजेडीवाय) अंतर्गत बँक खात्यात जमा रक्कम 1.30 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. आणि एकूण खात्यांची संख्या 40 कोटींच्या पुढे गेली आहे.
परंतु आपण अद्याप हे खाते उघडलेले नसेल तर आपण बर्याच सुविधांचा लाभ घेण्यास सक्षम नाहीत. प्रधानमंत्री जन धन योजने (पीएमजेडीवाय) अंतर्गत खाते उघडल्या गेलेल्या ग्राहकांना अनेक नवीन सुविधा दिल्या जातात. या खात्यावर कोणकोणत्या आकर्षक सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया. तसेच हे लक्षात असावे की ज्या लोकांचे खाते आधारशी जोडले गेले असेल केवळ त्यांनाच या सुविधांचा लाभ मिळतो.
PMJDY: Ensuring affordable access to basic banking services to citizens of India.
Bank Account under PMJDY can be opened in any bankIing outlet (branch or Business Correspondent /Bank Mitr). More details: https://t.co/ys5nV35eFk@PMOIndia @FinMinIndia @PIB_India pic.twitter.com/cPagEL48hJ— DFS (@DFS_India) August 6, 2020
या खात्याचे फायदे :
– जन धन खाते विनामूल्य उघडले जाते तसेच त्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नसते.
– 6 महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे.
– 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते.
– 30,000 रुपयांपर्यंत लाइफ कव्हर, लाभार्थीच्या मृत्यूवर पात्रता अटींवर उपलब्ध होते.
– ठेवींवर व्याज उपलब्ध आहे.
– खात्यात फ्री मोबाइल बँकिंग सुविधा देखील पुरविली जाते.
– जन धन खाते उघडणार्याला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामधून तो खात्यातून पैसे काढू शकेल किंवा खरेदी करू शकेल.
– जनधन खात्यातून विमा, पेन्शन प्रोडक्ट्स खरेदी करणे सोपे आहे.
– जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन यासारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाती उघडली जातील.
– देशभरात मनी ट्रान्सफरची सुविधा दिली जाते.
– सरकारी योजनांच्या फायद्याचा पैसा थेट खात्यात येतो.
— DFS (@DFS_India) August 6, 2020
नवीन खाते उघडण्यासाठी करावे लागेल हे काम
आपणास आपले नवीन जनधन खाते उघडायचे असल्यास जवळच्या बँकेत जाऊन आपण हे काम सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/ रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड क्रमांक, पिन कोड इत्यादींची माहिती द्यावी लागेल.
जुन्या खात्यास असे बनवा जन धन खाते
आपल्याकडे जुने बँक खाते असल्यास ते जनधन खात्यात रूपांतरित करणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जन धन योजनेत वर्ग केले जाईल.
ही कागदपत्रे असणे आवश्यक
आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅनकार्ड, मतदार कार्ड, नरेगा जॉब कार्ड, अधिकृतता पत्र ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार क्रमांक असेल, राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेले लेटर ज्यात खाते उघडण्याचे प्रमाणित छायाचित्र लावलेले असेल.