नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली एक सिक्रेट गोष्ट आज शेअर केली आहे. त्यांच्या खास मित्रासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोदींचं प्राणी आणि पक्षी प्रेम अपार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून खूप अॅव्टिव्ह असतात. पण त्यांना आपल्या एका खास मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन काळात स्वत:ला निसर्गाच्या सानिध्यात ठेवले. यासंदर्भातील एक व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर आज (रविवार) शेअर केला आहे.
पंतप्रधान निवासस्थानी असलेल्या मोरांसोबत नरेंद्र मोदी वेळ घालवताना आणि त्यांना खायला देतानाचे खास क्षण त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापूर्वी देखील त्यांच्या बागेमध्ये अनेकवेळा मोर आणि लांडोर मुक्त विहार करताना पहायला मिळाले आहेत. पंतप्रधान मोदी मोराला अगदी प्रेमाने खायला देताना या फोटोमध्ये दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोर अगदी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्यासोबत बसून खात असल्याचे पहायला मिळत आहे.
पंतप्रधानांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांनी पसंत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निसर्ग आणि प्राणी-पक्षांवर असणारं प्रेम यातून आपल्याला दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओसोबत एक कविता देखील पोस्ट केली आहे.
मोदींची कविता
भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भायो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला |
रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आहे,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज |
जीवात्मा ही शिवात्मा,
अंतर्मन की अनंत धारा
मन मंदिर के उजियारा सारा,
बिन वाद-विवाद, संवाद
बिन सुर-स्वर, संदेश
मोर चहकता है महकता |
भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज। pic.twitter.com/Dm0Ie9bMvF— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2020