बहुजननामा ऑनलाईन टीम – न्यूयॉर्क मध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दोघांमध्ये ठेवण्यात आलेल्या कोकाकोलाच्या बाटलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यावर भारताच्या पंतप्रधान कार्यलयाने स्पष्टीकरण दिले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने या बाटलीविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की, अमेरिकेच्या वतीने हि बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि बैठक व्यवस्थाही त्यांच्या वतीनेच करण्यात आले होते. राष्ट्रपती ट्रम्प हे नियमितपणे कोक पीत असतात. यासाठी ही बाटली ठेवण्यात आली होती. या बैठकीत मोदी यांचे ट्रम्प यांनी तोंडभरून कौतुक केले होते.
#WATCH New York: PM Modi during bilateral meet with US President says, "I'm very thankful to President Trump that he came to Houston & gave so much of his time. It was a very proud moment for the Indians living in US. I express my heartfelt gratitude to President Trump for this" pic.twitter.com/sXj4L27uQa
— ANI (@ANI) September 24, 2019
या बैठकीत ट्रम्प म्हणाले की, मोदी माझे चांगले मित्र आहेत. मोदी यांनी या बैठकीत दहशतवादावर देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आपले मत देखील मांडले. दोन्ही देश मिळून काश्मीरच्या मुद्द्यावर देखील मार्ग काढू शकतो आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी ट्रम्प यांनी म्हटले.
सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सात दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये ते विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. तसेच काही करारांवर देखील चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
Visit : bahujannama.com