बहुजननामा ऑनलाईन टीम – मंगळवारी न्यूयॉर्क मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे भेट झाली. यावेळी दोघांमध्ये दहशतवादाविरोधातही चर्चा झाली. सीमेपार असलेल्या दहशतवाद्यांबाबत बोलताना मोदींनी सांगितले की, पाकिस्तानने प्रत्येक पावलावर धोका दिला आहे.या भेटीबाबत माहिती विदेश सचिव विजय गोखले यांनी देताना सांगितले की, आम्ही चर्चेपासून पळत नाही परंतु पाकिस्तानने दहशतवादावर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे असे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले.
आम्ही प्रत्येक वेळेस मैत्री करण्याचा प्रयत्न केला परंतु पाकिस्तानने प्रत्येक वेळेस आम्हाला धोकाच दिला. मी लाहोरला गेलो तेव्हा पठाणकोटला हल्ला झाला दहशतवादामुळे भारतात ४२ हजार जणांना आपला प्राण गमवावा लागला. यातील पीडितांना आद्यपही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पाकिस्तानने आधी दहशतवादावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेविषयी सांगताना म्हणाले, “पाकिस्तानने कारवाई करायची किंवा नाही हे स्वतः त्यांना ठरवायचे आहे. पाकिस्तानला माहित आहे की त्यांना काय कारवाई करायची आहे. असे मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले.
गोखले यांनी भारत आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या ४. २५ लाख करोड रुपयांच्या व्यापारी धोरणाबद्दल बोलताना म्हणाले की, “आम्ही अद्याप टाइमलाइनवर बोलणी केलेली नाही परंतु आम्हाला आशा आहे की लवकरच त्यावर करार होईल.” ट्रम्प यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काश्मीरबाबत निर्णय घेण्यासाठी भारत स्वातंत्र्य आहे. इम्रान खान यांनी आयएसआय ने अलकायद्याला ट्रेनिंग दिले असल्याची कबुली दिली होती. याबाबत ट्रम्प यांना विचारले असता ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी या गोष्टींकडे पाहून घेतील.
Visit : bahujannama.com