नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील एक अशी बँक योजना जी पंतप्रधानांच्या PM Modi नावावर सुरू करण्यात आली. गरीबांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे नाव प्रधानमंत्री जनधन योजना आहे. जिचा उद्देश देशात सर्व गरीबांचे बँक अकाऊंट उघडणे होता. हे अकाऊंट उघडण्यासाठी एक रुपया देखील खर्च येत नाही. झीरो बॅलन्सवर उघडणारे हे सेव्हिंग अकाऊंट कोणत्याही पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँकेत उघडता येऊ शकते. ज्यामध्ये अनेक सुविधा मिळतात. PM Modi prime minister jan dhan yojana scheme how to open an account and its benefits
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
अकाऊंट उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा PAN कार्ड, वोटर कार्ड, अथॉरिटीकडून जारी लेटर, ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार नंबर लिहिलेले असावा, गॅझेटेड अधिकार्याद्वारे जारी लेटर असावे, ज्यावर अकाऊंट उघडणार्याचा अटेस्टेड फोटो लावलेला असावा.
नवीन अकाऊंट उघडण्याची प्रोसेस :
जवळच्या बँकेत जा आणि फॉर्म भरा. ज्यामध्ये नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या ब्रँचचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार आणि अॅन्युएल इन्कम आणि अवलंबितांची संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड किंवा टाऊन कोड इत्यादी डिटेल द्यावा लागतील. तुमचे एखादे जुने सेर्व्हिग अकाऊंट जनधनमध्ये कन्व्हर्ट करू शकता. यासाठी ब्रँचमध्ये रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल.
अकाऊंटचे फायदे :
– जनधन अकाऊंट उघडल्याच्या 6 महिन्यानंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.
– 2 लाख रुपयांपर्यंत अॅक्सिडेंटल इन्श्युरन्स कव्हर आणि 30,000 रुपयांपर्यंत लाईफ कव्हर मिळते.
– जे पैसे जनधन खात्यात जमा करता त्यावर व्याज सुद्धा दिले जाते.
– या अकाऊंटमध्ये फ्री मोबाइल बँकिंग सुविधा मिळते.
– रुपे डेबिट कार्डची सुविधा दिली जाते, ज्याद्वारे तुम्ही पैसे काढू शकता, खरेदी सुद्धा करू शकता.
– या खात्यातून इन्श्युरन्स पॉलिसी आणि पेन्शन योजनांमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता.
– पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन सारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडणे सोपे होते.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Web Titel : PM Modi | prime minister jan dhan yojana scheme how to open an account and its benefits