नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज देशवासीयांना संबोधित करताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोरोना विरोधातील लसीकरणासंदर्भात (Vaccination) पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण (Free vaccination) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यांना सर्व लसी मोफत देण्यात येतील. तर एकूण लसींपैकी 25 टक्के लसी या खासगी (Private) क्षेत्राला देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
खासगी क्षेत्राला लस देण्याची घोषणा करताना लसीच्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त 150 रुपये आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
म्हणजेच खासगी रुग्णालयांमध्ये (private hospitals) लसीच्या किंमतीपेक्षा केवळ 150 रुपये अधिक देऊन लस घेता येणार आहे.
या नियमांचे पालन कोरोना संदर्भातील जबाबदारी राज्य सरकारांवर (state governments) सोपवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
योग दिनापासून मोफत लसीकरण (Free vaccination)
21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिनापासून (International Yoga Day) देशातील प्रत्येक राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी भारत सरकार मोफत लस देणार आहे.
भारत सरकार स्वत: लस विकत घेऊन 75 टक्के लसी राज्यांना मोफत वाटणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केलं आहे.
उरलेल्या 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहेत.
मात्र, तिथे सुद्धा रुग्णालयांनी लसींसाठी वाटेल तसे पैसे घेऊन नयेत म्हणून लसीच्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त 150 रुपये अधिक सेवा शुल्क (Service charge) म्हणून लस देण्याचा नियम बनवण्यात आला आहे.
कृपया हे देखील वाचा:
मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार ?
दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 514 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत
PM मोदी यांची घोषणा ! दिवाळीपर्यंत 80 कोटी गरीबांना मोफत धान्य
PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार
चिंताजनक ! पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली, आळंदी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका