नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत शेतकर्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते दर चार महिन्याच्या अंतराने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) अंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात (PM Kisan Yojana) पोहचतात.
काही दिवसांपूर्वीख शेतकर्यांना 9वा हप्ता जारी केला गेला होता. यामध्ये अनेक शेतकरी असे होते ज्यांनी वेळेवर अर्ज केला होता आणि लाभार्थी यादीत त्यांचे नाव सुद्धा होते परंतु त्यांना हप्ता मिळू शकला नाही.
या चूका टाळा
1. यासाठी कारण योजनेच्या अंतर्गत ठरलेल्या अटींनुसार अर्ज भरला गेला नव्हता. नियमानुसार अर्जात शेतकर्याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे, ज्या शेतकर्यांचे नाव अर्जात HINDI मध्ये आहे, त्यांनी आपले नाव पुढील हप्ता येण्यापूर्वी दुरूस्त करावे. अर्जात केवळ इंग्रजी अल्फाबेटसह नाव नोंदवा.
2. अर्जात अर्जदाराचे नाव आणि बँक अकाऊंटमध्ये अर्जदाराचे नाव वेगळे असल्यास हप्ता अडकू शकतो.
अशावेळी शेतकर्याने आपल्या बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन बँकेत आपले नाव आधार आणि अर्जात दिल्याप्रमाणे दुरूस्त करून घ्यावे.
3. इतर कारणांमध्ये बँक अकाऊंट नंबर आणि IFSC कोड चुकीचा लिहिणे, गावाच्या नावात चुक हे सुद्धा कारण आहे.
अशी दुरूस्त करा चूक
पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in च्या होम पेजवरील Farmers Corner वर क्लिक करून ही माहिती दुरूस्त करता येऊ शकते.
याशिवाय शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन सुद्धा ही दुरूस्ती करू शकतात.
Web Title : PM Kisan Yojana | pm kisan yojana farmers make these mistakes in the application if you want 6 thousand rupees every year
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी