केंद्र सरकार दरवर्षी दोन हजार रूपयांच्या तीन हप्त्यात 6 हजार रूपये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात ट्रान्सफर करते. आतापर्यंत अंदाज वर्तवला जात होता की, 10 हप्ता 25 डिसेंबरला पाठवला जाऊ शकतो, कारण गेल्यावर्षी सुद्धा 25 डिसेंबरला हप्ता आला होता. तत्पूर्वी 15 डिसेंबर तारीख समोर आली होती, परंतु आता स्पष्ट झाले आहे की, नवीन वर्षात 1 जानेवारीला पैसे शेतकर्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील. (PM Kisan Yojana Date)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पीएम किसानच्या दहाव्या हप्त्याबाबत शेतकर्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी (Prime Minister Shri. Narendra Modi) 1 जानेवारी 2022 ला दिवसा 12 वाजता पीएम किसान योजनेचा हप्ता जारी करतील आणि शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदान जारी करतील.
या कार्यक्रमात तुम्ही pmindiawebcast.nic.in अथवा दूरदर्शनच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. कार्यक्रमाचे आपणा सर्वांना आमंत्रण आहे. आपला, नरेंद्र सिंह तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री (Narendra Singh Tomar, Minister of Agriculture and Farmers Welfare).
Web Title :- pm kisan yojana date confirm 1st january 2022 new year modi government 2000 sms by narendra singh tomar
Ravichandran Ashwin | शास्त्रींवर संताप, अश्विनच्या वक्तव्याने टीम इंडियातील गोंधळ वाढणार का?
Chandrakant Patil | ‘उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज…’ – चंद्रकांत पाटील