नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकर्यांना केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये देते. 6,000 रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यात सरकारकडून शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट पाठवली जाते. हा हप्ता प्रत्येक वर्षी एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये ट्रान्सफर केला जातो. चालू आर्थिक वर्षात शेतकर्यांच्या खात्यात दोन हप्ते पाठवण्यात आले आहेत. आता सरकार डिसेंबर 2020मध्ये या आर्थिक वर्षातील तिसरा हप्ता पाठवणार आहे. अशावेळी जर तुम्हाला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत डिसेंबरमध्ये 2000 रूपयांचा लाभ घ्यायचा असेल तर उशीर न करता पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करा. याची पद्धत खुप सोपी आहे आणि घरबसल्या आपण या योजनेचा लाभ घेवू शकता.
या शेतकर्यांना मिळणार नाही लाभ
असे शेतकरी जे भूतकाळात किंवा सध्या संविधानिक पदावर आहेत, माजी अथवा सध्याचे मंत्री, मेयर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभा खासदार शेतकरी असले तरी या योजनेच्या बाहेर समजले जातील. केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी आणि 10 हजारपेक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी. नोकरदार, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट. मागच्या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी. केंद्र आणि राज्य सरकारचे मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/समूह डी कर्मचारी यांना लाभ मिळेल.
येथे जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन
– पीएम किसानची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वर दिलेल्या Farmer corner टॅबवर क्लिक करा. येथे शेतकर्यांना रजिस्टर करण्याचा पर्याय दिला आहे.
– फार्मर कॉर्नर टॅबमध्ये new registration च्या पर्यायावर क्लिक करा.
– असे करताच एक नवे पेज ओपन होईल. यावर तुमचा आधार क्रमांक एंटर केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
– रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये पूर्ण माहिती भरा. यामध्ये राज्य, जिल्हा, तालूका आणि गाव इत्यादी माहिती द्यावी लागते.
– सोबतच शेतकर्यांना नाव, जेंडर, कॅटगरी, आधारकार्डची माहिती, बँक अकाऊंट नंबर, आयएफएससी कोड, पत्ता, मोबाइल नंबर, जन्म तारीख इत्यादी माहिती द्यावी लागते.
– याशिवाय शेतकर्यांना जमीनीचा सर्व्हे खाते नंबर, हिस्सा नंबर, जमीनीचा प्रकार इत्यादी माहिती द्यावी लागते.
– सर्व माहिती भरल्यानंतर saveच्या पर्यायावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म submit करा.
– या रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंटआऊट घेऊन भविष्यासाठी ठेवून द्या.
अशा सुधारा रजिस्ट्रेशनमधील चूका
– पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
– आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.
– जर तुम्ही या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि लाभार्थींच्या यादीत नाव तपासायचे असेल तर तुम्हाला सरकारने ही सुविधा ऑनलाईन दिली आहे. पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी या वेबसाईटवर तपासू शकता.