नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोट्यवधी शेतकर्यांच्या खात्यात लवकरच पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सातव्या हप्त्याचे पैसे टाकले जातील. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार 10 डिसेंबरपासून शेतकर्यांच्या खात्यात सातवा हप्त्याची रक्कम पाठवण्यास सुरूवात करू शकते. या योजनेत सुमारे 11.37 कोटी शेतकर्यांच्या खात्यात डीबीटीएल म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर स्कीम अंतर्गत थेट 2000 रुपये पाठवले जातात.
या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकर्याला 2-2 हजारच्या तीन हप्त्यात 6000 रुपये दिले जातात. ही योजना लागू झाल्यानंतर मागील 23 महिन्यात केंद्र सरकारने 11.35 कोटीपेक्षा जास्त शेतकर्यांना थेट एक लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त मदत पोहचवली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांचे अधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे जरूरी आहे.
केव्ह-केव्हा येतो हप्ता ?
पीएम किसान योजनते केंद्र सरकार तीन हप्त्यात रक्कम ट्रान्सफर करते. पहिला हप्ता 1 डिसेंबरपासून 31 मार्चच्या दरम्यान, दुसरा हप्ता 1 एप्रिलपासून 31 जुलैच्या दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकर्यांच्या खात्यात येतो. अनेक शेतकर्यांच्या खात्यात पैसे येत नसल्याच्या सुद्धा तक्रारी आहेत. अधिकार्यांनुसार, नाव, स्पेलिंग, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक चुकीचा असल्यास ही गडबड होऊ शकते.
असे करू शकता आधार अपडेट
पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर चा टॅब दिसेल. जर अगोदर अर्ज केला असेल, परंतु तुमचे आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल किंवा त्याचा नंबर नोंदवण्यात चूक णाली असेल, तर येथे माहिती मिळेल. तुम्ही ती लवकर दुरूस्त करा. फार्मर कॉर्नरमध्ये शेतकर्यांना स्वताला नोंदणी करण्याचा पर्याय दिला आहे. यामध्ये सरकारने सर्व लाभार्थ्यांची पूर्ण यादी अपलोड केली आहे. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती आणि महिती आधार क्रमांक, बँक खाते, मोबाइल नंबरद्वारे जाणून घेवू शकता.
असे चेक करा – किती हप्ते मिळाले, केव्हा कोणत्या खात्यात गेला
* पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा.
* येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
* आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा.
*आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.
लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव
* जर तुम्ही या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि लाभार्थींच्या यादीत नाव तपासायचे असेल तर तुम्हाला सरकारने ही सुविधा ऑनलाईन दिली आहे. पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी या वेबसाईटवर तपासू शकता.
* येथे ‘लाभार्थी यादी’ च्या लिंकवर क्लि करा.
* यानंतर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गावाचा तपशील नोंदवा.
* एवढे भरल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पहा.
लिस्टमध्ये नाव नसेल तर काय करायचं?
अर्ज केल्यानंतर सुद्धा पैसे न मिळाल्यास आपले लेखपाल, जिला कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्याकडे काम झाले नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी हेल्पलाइन वर संपर्क करा. तेथूनही प्रतिसाद न मिळाल्यास मंत्रालयाच्या दुसर्या नंबरवर संपर्क करा.
हेल्पलाईन नंबर – 011-24300606.
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
पीएम किसान लँडलाइन नंबर : 011्र23381092, 23382401
पीएम किसानची नवी हेल्पलाईन : 011-24300606, 0120-6025109