नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून त्यात त्यांनी एका इंजेक्शनमुळे समोर उभ्या असलेल्या नर्स त्यांना हूर सारख्या दिसू लागल्या, असे ते म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ कराचीमधील शौकत खान रुग्णालयाचा असल्याचे सांगण्यात येत असून एका भाषणादरम्यान इम्रान खान यांनी हे वक्तव्य केले आहे.
२०१३ मध्ये निवडणूकीच्या प्रचारादरम्यान ते अचानक खाली कोसळल्यामुळे त्यांच्या पाठीवर जखम झाली. त्यामुळे इम्रान यांना रुग्णलयात नेण्यात आले त्यावेळी त्यांना इंजेक्शन देण्यात आले होते. त्याबद्दल सांगताना इम्रान म्हणाले की, डॉक्टरांनी मला असे इंजेक्शन दिले की मी माझे दुखणे विसरलो. एवढेच नाही तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नर्स मला परी प्रमाणे वाटू लागल्या म्हणून मी डॉक्टरांना पुन्हा एकदा तेच इंजेक्शन देण्यास सांगितले. पण त्यांनी मा त्र दुसरेच पेनकिलर दिले. खरंच या ठिकाणचे डॉक्टर खूप चांगले आहेत, असे इम्रान खान म्हणाले.
One injection is all it takes for the PM to see nurses as hoors.. pic.twitter.com/syX4hAPxY0
— Naila Inayat (@nailainayat) January 27, 2020
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी त्यांच्या ट्विटरवरून इम्रान खान यांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी सर्व नर्स परीप्रमाणे दिसण्यासाठी पीएम यांना केवळ एका इंजेक्शनची गरज आहे, असे लिहिले आहे.
Visit : bahujannama.com