बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने टीममधून वेगळा प्रवास करणाऱ्या ब्राझिलियन फुटबॉल क्लब पालमसच्या चार फुरबॉलपटूनचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. उत्तरेकडील प्रांत टोकॅंटिसमध्ये उड्डाण(Plane crash in Brazil) घेण्यापूर्वी हे विमान धावपट्टीवरून कोसळले होते. या अपघातात पालमस क्लबचे अध्यक्ष व पायलटही ठार झाले. क्लबच्या म्हणण्यानुसार हे खेळाडू व्हिला नोव्हा विरुद्ध सामना खेळण्यासाठी गोएनियाला जात होते. क्लबच्या प्रवक्त्या इझाबेला मार्टिन्स यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, खेळाडू कोविड – 19 पॉझिटिव्ह असल्याचे समजले असता ते खासगी विमानाने प्रवास करीत होते.
मार्टिन्स म्हणाले की, रविवार हा त्यांच्या क्वारंटाईनचा शेवटचा दिवस होता. मृतांमध्ये क्लबचे अध्यक्ष लुकास मीरा आणि खेळाडू ल्यूकास प्रॅक्सडेस, गुलरमे नो, रानुले आणि मार्कस मोलिनेरी यांचा समावेश आहे. वैमानिकाची ओळख पटली नाही. दोन इंजिन असणाऱ्या विमानात पायलटसह केवळ सहा प्रवासी बसू शकत होते.