ललितपुर : Pizza | उत्तर प्रदेशच्या ललितपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नर्सिंगच्या एका विद्यार्थीनीने केवळ या कारणामुळे आपला जीव दिला (Suicide), कारण आईने तिला पिझ्झासाठी (Pizza) थोडी प्रतीक्षा करण्यास सांगितले होते. या विद्यार्थीनीचा वाढदिवस दोन दिवसापूर्वीच साजरा करण्यात आला होता. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला.
आईने पिझ्झा आणण्यास केला थोडा उशीर
तलाबपुरा परिसरात राहणारे मोहनलाल सोनी यांची मुलगी शिखा सोनी (18) हिने सोमवारी रात्री आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शिखाचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला.
शिखाने आपल्या आईकडे पिझ्झा (Pizza) मागितला होता. आईने पिझ्झासाठी थोडे थांबण्यास सांगितले. यामुळे नाराज झालेल्या शिखाने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दोन दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस
मृत मुलीचे वडील मोहन लाल यांनी सांगितले की, तिने नर्सिंगचा कोर्स केला होता. ती जिल्हा हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांचे ट्रेनिंग करत होती. सोमवारी सायंकाळी जेव्हा शिखाने तिच्या आईकडे पिझ्झा मागितला तेव्हा आईने थोड्या वेळाने पिझ्झा देते, असे म्हटले.
यामुळे ती नाराज झाली आणि ताबडतोब तिच्या खोलीत निघून गेली.
काही वेळाने जेव्हा खोलीत पाहिले तेव्हा तिचा मृतदेह फासावर लटकत होता.
कुटुंबीयांनी सांगितले की, 10 ऑक्टोबरलाच शिखाचा वाढदिवस साजरा केला होता.
घरात शिखासह तिच्या आणखी दोन बहिणीसुद्धा आहेत.
शिखा घरात सर्वात लहान होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, तरूणीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
web title: Pizza up girl ends her life due to delay in getting pizza.