बहुजननामा ऑनलाईन टीम : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून सभागृहात वादविवाद आणि प्रश्नोत्तरांची फेरी सुरु आहे. त्यात बुधवारी संसदेत एक चित्र समोर आले असून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे, या फोटोंमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल कारमधून खाली उतरताच संसदेच्या दिशेने धावत असून लवकरात लवकर लोकसभेवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, आजूबाजूचे मंत्री उभे राहून ते दृश्य पाहत आहेत.
या चित्रामुळे सोशल मीडियावर पियुष गोयल यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. लोक त्या फोटोजवर गमतीशीर कमेंट्स देत आहेत. गुजरातमधील बारदोलीचे खासदार प्रभू वसावा यांनी पीयूष गोयल यांची छायाचित्रे ट्विट करत कॅप्शन मध्ये लिहिले कि, ‘ऊर्जामंत्री पियुष गोयल कॅबिनेट मिटींगच्या बैठकीनंतर पळत संसदेत पोहोचले आहे. ज्यामुळे सभागृहात उशीर होऊ नये.’
नव भारत के ऊर्जावान मंत्री आदरणीय @PiyushGoyal जी कैबिनेट मीटिंग की समाप्ति के बाद भागते हुए संसद में पहुँचे ताकि प्रश्न काल में देर ना हो जाए। pic.twitter.com/PwPrERv9zl
— Prabhu Vasava MP (@prabhunvasava) December 4, 2019
लोक सोशल मीडियावर यावर कमेंट करत आहेत आणि आपले मत देत आहेत. काही ट्विटर त्यांचे कौतुक करत आहेत तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत. पृथ्वीराज यांनी ट्विट करुन लिहिले आहे की, “कदाचित त्यांना हजेरीसाठी उशीर होत असेल.”
https://twitter.com/payalmehta100/status/1202108857431945216
याशिवाय किरण नावाच्या एका यूजर्सने लिहिले की, ‘रेल्वेच्या प्रभावी कमाईवर प्रश्न टाळण्यासाठी पळताना पियुष गोयल.’ आणखी रक्त यूजर्सने लिहिले कि, ‘२x गोयल एक्सप्रेस’.
https://twitter.com/scribe_prashant/status/1202109977260781568
यासोबतच काही लोकांनी लिहिले, ‘जेव्हा तुम्हाला माहित असते, की लाँचमध्ये बिर्याणी असते, तेव्हा अश्याच पद्धतीने पळावे लागते’.
https://twitter.com/payalmehta100/status/1202108857431945216
दरम्यान, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये सर्व मंत्र्यांनी भाग घेतला. बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी रेल्वेसंदर्भात अनेक प्रश्न विचारले गेले. लोकसभेतच प्रश्नांची उत्तरे देताना पीयूष गोयल यांनी रेल्वेमधील एफडीआयचा आकडा दिला.
Visit : bahujannama.com