पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – भोसरीतील गोल्डमॅन Goldman दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. भोसरी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवयांमध्ये 18 लाख 95 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रमोद उर्फ कक्काल संतराम धौलपूरिया, प्रसन्न उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार (वय-36) आणि अंकुश उर्फ तात्या रंगनाथ डांगले (वय-29 सर्व रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी प्रमोद उर्फ कक्काल संतराम धौलपूरिया हा गोल्डमॅन Goldman दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सपळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी या कारवाईत तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे असा एकूण 94 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुलै 2016 मध्ये कट रचून फुगेंचा खून
सोन्याचा शर्ट परिधान केल्यामुळे चर्चेच आलेल्या दत्ता फुगे यांचा 15 जुलै 2016 रोजी खून करण्यात आला. पुण्यातील दिघी येथील भारतमाता नगर परिसरात हे खून प्रकरण घडले. दत्ता फुगे यांचा खून पद्धतशीरपणे कट रचून करण्यात आला होता, असे दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम फुगे याने सांगितले होते. महत्त्वाचे म्हणजे या खून प्रकरणाचा तो महत्त्वाचा साक्षीदारही आहे. दत्ता फुगे यांच्या पत्नी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेविका आहेत.
भोसरी पोलिसांकडून 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
दुसऱ्या कारवाईत राजेश बैजू नेटके (वय-23) याला अटक केली आहे.
कासारवाडी व दापोडी परिसरात गाड्या अडवून हत्यारांचा धाक दाखून लूटमार करणाऱ्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली होती.
त्याने त्याचे साथिदार सागर राजू नायर (वय-19) व सिद्धार्थ उर्फ भाव्या (रा. कासारवाडी झोपडपट्टी) यांच्या मदतीने जबरी चोरी केल्या.
त्याच्याकडून 52 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन भोसरी व सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आणले.
8 लाखांच्या 12 दुचाकी जप्त
तिसऱ्या कारवाईत पोलिसांनी वाहन चोराला अटक केली. अक्षय संतोष मोरे (वय-24) याला ताब्यात घेतले. त्याने त्याचे साथीदार राहुल गणेश पाटील (वय-23) अक्षय बब्रुवान खोसे (वय-21) गणेश बबन जानराव (वय-22) यांच्या मदतीने चोरी केलेल्या 8 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 12 दुचाकी जप्त केल्या असून सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
13 दुचाकी जप्त, 10 गुन्हे उघड
भोसरी पोलिसांनी केलेल्या चौथ्या कारवाईत दोन वाहन चोरट्यांकडून 9 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करुन 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत. अरशद हनिफ सय्यद (वय-19) अनिकेत सचिन झेंडे (वय-20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कृपया हे देखील वाचा:
10 वी च्या परीक्षा होणार नाहीत हे जवळपास निश्चीत, उच्च न्यायालयातील याचिका मागे
महिलांना अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग करणारा चहावाला ‘गोत्यात’; पिंपरीतील घटना
काय सांगता ! होय, मुंबईत पोलिसानेच घातला सराफाला 1.25 कोटींचा गंडा