जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – पिंप्राळा शिवारातील खंडेराव नगरात मन्सुरी पिंजारी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सोहळ्यात ३७ जोडपी विवाहबद्ध झाली. या मेळाव्यासाठी राज्यासह मध्यप्रदेश, गुजरात येथुन समाज बांधव उपस्थित होते.
सामूहिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.सुरेश भोळे, माजी आ.सुरेशदादा जैन, उपमहापौर अश्विन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गफ्फार मलिक, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, नगरसेवक अतुल बारी, कुलभूषण पाटील, नगरसेवक रियाज बागबान, जी.एस.सावळे, काँग्रेसचे प्रभाकर सोनवणे, गणी मेमन, सलिम पिंजारी, पो.नि. बेंद्रे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. मान्यवरांच्याहस्ते विवाह सोहळ्यास मदत करणाऱ्या दानशुरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मन्सुर पिंजारी बिरादरीतर्फे २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याचे पॉम्प्लेट अनावरण माजी आ. सुरेशदादा जैन यांच्याहस्ते करण्यात आले.