बहुजननामा ऑनलाइन टीम – एमआयडीसी भोसरी(Pimpri ) पोलीस ठाण्याच्या (MIDC Bhosari Police Station) हद्दीतील बालाजीनगर(Pimpri) येथील काही सराईत गुंडांनी तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक फोटोही सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.
फोटोमुळं संतापले कृष्ण प्रकाश (Krishna Prakash)
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “तलवारीनं केक कापताना जेवढे सामील होते त्या सर्वांवर कारवाई करा. त्यांनी परवानगी घेतली होती का, ते रस्त्यावर आलेच कसे, वाढदिवस साजरा करण्यासाठी चौक किंवा रस्ता असतो का, त्यांच्यावर योग्य कलम न लावता जुजबी कलमांतर्गत कारवाई झाली आहे. हे फार चुकीचं आहे. हे संबंधिंतांनी नीट लक्षात घ्यावं. अशा विकृतींना समाजात नाही गजाआड ठेवलं पाहिजे. आगामी काळात अशा प्रकारची एकही चूक होता कामा नये.”
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (MIDC Bhosari Police Station) हद्दीतील बालाजीनगर येथील काही सराईत गुंडांनी तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा केला याचा फोटोही सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.
फोटोमुळं संतापले कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) pic.twitter.com/i0iTRRmhqB— TimePass (@TimePassTalks) October 20, 2020
पुढं ते म्हणाले, “अशा गुन्हेगारांना कायदेशीर मार्गानंच धडा शिकवला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे आता आमचं काही खरं नाही. ज्या चौकात हे दहशत पसरवतात त्यांना तिथंच ठोकलं पाहिजे. ते कसं काय गर्दी करून दहशत पसरवू शकतात. त्या चौकात त्यांचं राज्य आहे का, पण हे लक्षात ठेवा चौक सर्वसामान्य नागरिकांचा आहे. कुणाच्या बापाचा नाही. तसंच काहीजण दुचाकीचा आवाज काढत फिरतात. फॅन्सी नंबरप्लेट लावून रॅश ड्राईव्ह करतात. त्याच्यावरही कारवाईची मोहिम राबवा. जर पुन्हा माझ्याकडे तक्रारी आल्या तर संबंधित वरिष्ठ निरीक्षकाची त्याच्या हद्दीवर पकड नाही, असं समजून मेमो दिला जाईल. त्यानंतर मी काय कारवाई करतो ते तुम्ही बघालच.”
या प्रकरणी स्वप्निल पोटभरे, महेंद्र सरवदे, सलीम शेख, अभिषेक देवकर यांच्यासह इतर 3 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर MIDC भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेत दक्ष राहण्याचं आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे.