पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – रविवारी कडक लॉकडाऊन असतानाही विनामास्क कार चालविणार्यावर कारवाई करणार्या पोलीस शिपायाला मारहाण करण्याचा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला.
वाकड पोलिसांनी मनविंदर सिंग भाटिया (वय ४८, रा. मिरचंदनानी पाल्मस सोसायटी, रहाटणी, वाकड) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सतिश जनार्दन देवकर यांनी वाकडे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
सतिश देवकर हे सांगवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते रविवारी सकाळी पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात कर्तव्यावर होते. यावेळी सकाळी ११ वाजता मनविंदर भाटिया हा विनामास्क कार चालवत असल्याचे दिसून आल्यावर त्यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला. तरी तो न थांबता पुढील सिग्नलला जाऊन थांबला. व आजू बाजूच्या वाहनांना व रहदारीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने कार उभी केली. कारमधून उतरुन त्याने देवकर यांच्याशी वाद घातला. विनामास्क चे मनपाचे पावती पुस्तक व त्याचे लायसन्स जबरदस्तीने हिसकावून शासकीय कामात अडथळा आणला. देवकर हे पावती पुस्तक परत घेत असताना त्यांच्या डाव्या हाताला मारहाण केली. वाकड पोलिसांनी भाटिया याला अटक केली आहे.