पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – संशयितरित्या अंधारात वावरत असलेल्या टोळक्याला गस्तीवरील पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांनी पोलिसांवर दगडफेक (Stone throwing) केली. त्यात एक पोलीस अंमलदार जखमी झाला आहे. ही घटना सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस अंमलदार अमोल लावंड असे जखमी झालेल्या पोलिसांचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, अमोल लावंड आणि कल्याण भोसले हे दोघे रात्री गस्त घालत होते.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांना घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंधारात काही जण थांबले असल्याचे दिसले.
त्यांनी वाहन थांबवून त्यांना आवाज देऊन हटकले अमोल लावंड हे पुढे होते.
पोलिसांना पाहून त्या टोळक्याने त्यांच्या दिशेने दगडफेक (Stone throwing) करण्यास सुरुवात केली.
त्यात लावंड हे जखमी झाले. पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले. त्यानंतर हे टोळके पळून गेले.
ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी पोहचले़ त्यांनी अमोल लावंड यांना रुग्णालयात नेले.
सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
ओम प्रॉपर्टीच्या भागीदारांवर एकाच जागेवरुन दुसरा फसवणुकीचा FIR दाखल
Unlock च्या गोंधळावरून फडणवीसांची सरकारवर टीका, म्हणाले – ‘ही अपरिपक्वता की श्रेयवाद?’
उत्तर प्रदेश भाजपमध्ये बंडाची तयारी? 126 आमदार झेंडा बदलण्याच्या मनस्थितीत
जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?