पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri News| घरी जात असलेल्या तरुणाला सिगारेट आणण्यास सांगितल्यावर त्याने नकार दिला. या कारणावरुन टोळक्याने तरुणावर कोयते, चाकू, दगडाने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात पिंपरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
Pimpri News | attempt to murder news
उमेश संभाजी पवार, अमोल संभाजी पवार, गोपल्या दांडे,(Umesh Sambhaji Pawar, Amol Sambhaji Pawar, Gopalya Dande,) बाळ्या ऊर्फ कृष्णा शिवाजी वारभवन, व्यंकटेश म्हेत्रे (सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच त्यांच्या ३ ते ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सतिश देविदास शिंगाडे (वय २२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी चिंचवड)(Indiranagar slum Chinchwad) याने फिर्याद दिली आहे. ही घटना चिंचवडमधील इंदिरा गांधी झोपडपट्टीत २२ जून रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.सतिश शिंगाडे हा त्याचा मित्र आक्रम खान याचा वाढदिवस साजरा करुन घरी चालला होता. यावेळी रस्त्याच्या कडेला घोळका करुन आरोपी थांबलेले होते.
त्यातील अमोल पवार याने सतिश शिंगाडे याला मारुन टपरीवरुन सिगारेट घेऊन येण्यास सांगितले. त्यावर त्याने मी आता घरी चाललो आहे. तु दुसर्या कोणाला तरी सांग असे सांगितले. त्याचा राग येऊन अमोल याने त्याच्या गालावर चापट मारली. त्याचा जाब सतिश याने विचारल्यावर या टोळक्याने शिवीगाळ करुन हातातील कोयते, चाकू व दगडाने फिर्यादीच्या डोक्यात, पोटावर व अंगावर ठिकठिकाणी मारुन जबर जखमी केले. पिंपरी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन ५ जणांना अटक केली आहे.
web title: Pimpri News | Refusing to bring cigarettes, the gang tried to kill the youth with a scythe
Navi Mumbai | नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज विशाल मोर्चा