पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – चहामध्ये गुंगीचे औषध टाकून महिलावर बलात्कार करुन त्याची व्हिडिओ काढून त्याद्वारे तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी २ महिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राहुल किसन जाधव (वय २७, रा. घोरपडी लाईन, पुणे), किसन रेखाजी जाधव, संजय राठोड (रा. मालेवाडीतांडा, ता. परळ, जि़ बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी यांनी २७ फेब्रुवारी २०२० रोजी चहामध्ये गुंगी येणारा पदार्थ टाकून फिर्यादीला पिण्यास दिला होता. त्यामुळे फिर्यादी हिला गुंगी आल्यावर राहुल जाधव याने तिच्यावर बलात्कार केला.
त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ, फोटो सोशल मिडियावर टाकण्याची वारंवार धमकी देऊन राहुल जाधव याने या महिलावर चिंचवड तसेच अंबाजोगाई येथील काळवटीतांडा, बीड व इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच २ महिला व इतरांनी या महिलेला वारंवार धमकावले. शेवटी तिने या छळाला त्रासून पोलिसांकडे धाव घेतली.