वाकड/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – टिंडर अॅपवर ओळख झालेल्या मित्राने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने महिलेवर हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर महिलेला घरी घेऊन जाऊन बेदम मारहाण करुन बलात्कार केला. ही घटना शनिवारी (दि.26) दुपारी चार ते रात्री साडे अकराच्या दरम्यान घडली.
अभिजित सिताराम वाघ (रा. घर नं.31/ए, आस्की कॉम्प्युटर जवळ, तापकिर नगर चौक, काळेवाडी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांची टिंडर अॅपवर ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन अभिजित याने महिलेला दुपारी चारच्या सुमारास हिंजवडी येथील एफ एम एल हॉटेलवर नेले. त्या ठिकाणी महिलेला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर त्याने महिलेला त्याच्या घरी घेऊन गेला.
घरी गेल्यानंतर त्याने महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याला विरोध केला. यावरुन संतापलेल्या अभिजितने महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन डाव्या डोळ्यावर, कानावर आणि तोंडावर मारुन जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपीने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला, असे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे करीत आहेत.