पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – अल्पवयीन असताना अपहरण करुन बलात्कार केल्याच्या खटल्यात साक्ष बदलावी, यासाठी एका तरुणीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहारुख रशीत तांबोळी, शमीना रशिद तांबोळी, रशीद इस्माईल तांबोळी (रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची पुतणी हिच्यावर ती अल्पवयीन असताना २०१९ मध्ये अपहरण करुन बलात्कार करण्यात आला होता.
त्याप्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात ३६३, ३७६ (एन), पोक्सो ३, ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. ही पिडित आता १९ वर्षाची झाली असून तिच्यावर लग्नाची सक्ती करता यावी, यासाठी तिघांनी तिचे ७ ऑक्टोबर रोजी अपहरण केले आहे. तिने पूर्वीच्या गुन्ह्यातील जबाब बदलावा, यासाठी तिचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.