पुणे (हिंजवडी) : बहुजननामा ऑनलाइन – बालेवाडी फाट्याजवळ सिंटेंट कॉर्नर इमारतीतील प्रियल टेव्कॉनॉलॉजी आयटी कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या आगीत संगणक, फर्निचर, पडदे जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अग्निशामक दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळळी. तर स्वारगेटमध्ये एका मोटारीने अचानक पेट घेतला. या दोन्ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडल्या.
रविवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. परंतु, येथील सुरक्षा रक्षक होते. दरम्यान, सिंटेंट कॉर्नर इमारतीतील चौथ्या मजल्यावरुन धुर निघत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली. पाषाण येथील अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीने पुर्ण चौथा मजला आणि इतर ठिकाणीही घेरा घातला होता. अग्निशामक जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण समजू शकले नसल्याची माहिती अधीक्षकांनी दिली.
ही कामगिरी सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, स्टेशन अधिकारी शिवाजी मेमाणे, संजय शेवाळे, कमल खान, दामोदर खमसे, स्वप्निल वाघमारे, लतेज चौधरी, निकाळजे, मुंगसे, हमीद खान यांच्या पथकाने केली.
स्वारगेटमध्ये मोटारीने घेतला पेट –
स्वारगेटमधील पीएमपीएल बसडेपोसमोर एका मोटारीने पेट घेतला होता. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका कारने मोटारीने अचानक पेट घेतल्याने परिसरातून जाणार्या नागरिकांनी अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. त्यानुसार अग्निशमक दलाच्या जवानांनी पंधरा मिनीटामध्ये आगीवर नियंत्रण मिळविले.